क्रीडा व मनोरंजन

नवीमुंबई क्रिकेट स्पर्धेत टिम यौध्दा ईलेव्हन स्पोर्ट्स पणुंब्रे प्रथम

Spread the love

कोकरुड /प्रतिनिधी

32 शिराळा स्पोर्टस् असोसिएशन अंतर्गत विशाल नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामलीला मैदान नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत टीम योद्धा ईलेव्हन स्पोर्ट्स पणुंब्रे संघाने प्रथम क्रमांक मिळवित आकर्षक चांदीची ट्रॉफी पटकावली.यावेळी फाईव्ह स्टार मराठेवाडी संघ द्वितीय, शिवशंभो स्पोर्ट्स मोहरे तृतीय, काळामदेवी स्पोर्ट्स काळामवाडी चतुर्थ, बिळाशी वॉरियर्स बिळाशी या संघाने पाचवा क्रमांक मिळवला. स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक शंकरदादा मोहिते, करुंगलीचे सरपंच संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत चाळीस संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील मालिकावीर – अमर मराठे,
उत्कृष्ट फलंदाज – सागर बनसोडे,उत्कृष्ट गोलंदाज – आनंदा पाटील,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – तानाजी बनसोडे, नामांकित क्रिकेटपटू विजय पावले यांचा सत्कार करण्यात आला.बक्षिस वितरण कार्यक्रमास उपवनसंरक्षक राहुल पाटील, भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी.आर.जाधव,पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम, पोलिस निरीक्षक महादेव कुंभार, पोलिस निरीक्षक संदीप सावंत,आर.एफ.ओ. सुशील मंचावर, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, विशाल नायकवडी,पांडुरंग नायकवडी,दीपक मस्कर,राजू शिंदे,महेश चोरमारे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!