ताज्या घडामोडी

कांदिवली पश्चिम मध्ये ” महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच ” च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शिबीराचे आयोजन.

Spread the love

भारत कवितके मुंबई
रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०२२रोजी सकाळी ९ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एक दिवसीय शिबीराचे आयोजन ” महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच च्या पदाधिकारी व कार्यकर्ते साठी कांदिवली पश्चिम मधील गणेश चौक,महावीर नगर,लिंक रोड,जुना पेट्रोल पंप समोर ,शुभम सभागृह येथे करण्यात आले आहे. या चिंतन शिबीराला मधुजी शिंदे मंच अध्यक्ष, विशेष अतिथी आमदार राम शिंदे,आमदार गोपीचंद पडळकर,डा.जे.पी.बघेल ,एम .ए.पाचपोळ,सह महाराष्ट्र राज्यातील मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.शिबीराचे सूत्रसंचालन बिरु कोळेकर करणार आहेत. या चिंतन शिबीरात संघटन बांधणी,उपक्रम, आंदोलने,मेंढपाळ समस्या,समाजाचे सामाजीक ,राजकिय चित्र,समाजाची लोकसंख्या,शासकिय योजना,पत्रव्यवहार,कार्यकर्ते ची आचार संहिता,वगैरे वगैरे विषयावर चर्चा विनिमय होणार आहे. सदर चिंतन शिबिराचे व्यवस्थापन राष्ट्रमाता अहिल्या शिक्षण संघ मार्फत करण्यात येणार आहे. मुंबई मधील समाज बांधवांनी या चिंतन शिबीरात उपस्थित राहवे.असे मंचाच्या वतीने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!