ताज्या घडामोडी

तरच साखर कारखाने उसाची आधारभूत किंमत देऊ शकतील – आमदार मानसिंगराव नाईक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : साखरेला 3500 रुपये भाव मिळाला तरच सहकारी साखर कारखाने ऊसाची आधारभूत किंमत देवू शकतील, असा पुर्नउच्चार .विश्वासराव नाईक कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक केला.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम २०२१-२२ साठी आज रोलर पूजन त्याच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, सहकारी साखर कारखानदारी प्रतिकूल वाटचाल करत आहे. सहकारी कारखानदारी टिकवायची असेल तर, जशी ऊसाला आधारभूत किंमत निश्चित केली आहे, त्याप्रमाणे साखरेलाही अधारभूत किंमत निश्चित करणे काळाची गरज बनली आहे. साखरेबाबतचे निर्यात धोरण निश्चित करायला हवे. सध्या देशातील बाजारपेठेत साखरेला म्हणावा तसा उठाव नाही. केंद्र सरकारचे निर्यात धोरण कचखाऊ आहे. सध्या निर्यात होणाऱ्या साखरेला चांगला दर येत असताना केंद्राने निर्यात बंदी केली आहे. यामुळे पुन्हा कारखानदारी पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातून कारखान्यांची मुस्कटदाबी होत आहे. साखरेला किमान ३५०० भाव मिळाला तरच कारखाने ऊसाची अधारभूत देवू शकतील, अन्यथा निर्माण होणार आहेत.
ते म्हणाले, गेल्या गळीत हंगामात कारखान्याने ५ लाख ८2 हजार 8८२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले. त्यातून ६ लाख ५७ हजार ५०० क्विंटल साखर पोती ऊत्पादन झाले. या गळीत हंगामातील आधारभूत किंमत २ हजार ९७२ रुपये होती. पहिल्या हप्त्यापोटी २ हजार ६०० रुपये, तर दुसऱ्या हप्त्यापोटी 200 रुपये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अदा केली आहे. सन 2022-23 च्या हंगामात संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जोरावर कारखाना यापेक्षा उठावदार कामगिरी करेल.
प्रारंभी आमदार मानसिंगभाऊंच्या हस्ते रोलरचे विधिवत पुजन झाले. यावेळी संचालक सर्वश्री. विराज नाईक, दिनकरराव पाटील, सुरेश पाटील, विजयराव नलवडे, बाबासाहेब पाटील, सुरेश चव्हाण, डॉ. राजाराम पाटील, विश्वास कदम, यशवंत निकम, शिवाजी पाटील, विष्णू पाटील, अजितकुमार पाटील, हंबीरराव पाटील, तुकाराम पाटील, यशवंत दळवी, बाळासाहेब पाटील, सुहास पाटील, बिरू आंबरे, संदीप तडाखे, आनंदा पाटील, सुकुमार पाटील, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, कोंडीबा चौगुले यांच्यासह प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील, अरुण साळुंखे, यु. जी. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!