ताज्या घडामोडी

कोणी नेता नव्हे…हे आहेत एक कर्तव्यदक्ष अधिकारी ..नगराध्यक्ष व नगरसेवक नसले तरी ही गावगाडा चालवला जावू शकतो याचे उदाहरण…

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा शहरात प्रशासनाच्या काळात नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांच्याकडून भरीव कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. शिराळा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे काम दैदिप्यमान आहे. शिराळा शहराचा विकास एकच ध्यास हे त्यांचे ब्रीद त्यांना लागू होते. त्याचप्रमाणे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी ही प्रशासक काळात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक नसले तरी गावगाडा अतिशय छान पद्धतीने चालवला जावू शकतो याचे सुंदर उदाहरण योगेश पाटील यांनी शिराळा नगरपंचायतीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
सध्या काही महीण्यांपासून शिराळा नगरपंचायतीवर प्रशासक आहेत. शिराळा शहरातील नगरपंयतीवर आमदार मानसिंगराव नाईक यांची एक हाती सत्ता होती. आमदार मानसिंगराव नाईक यांनी शहराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. परंतु शिराळा नगरपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रशासक नियुक्त होणारं हे ऐकूनच धडकी भरली. आता आपले नगराध्यक्ष नगरसेवक नगरपंचायतीत नाहीत आपली शासकीय कामे कशी होणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात येणे सहाजिकच आहे. परंतु नगराध्यक्ष अथवा नगरसेवक यांची उणीव प्रशासक योगेश पाटील यांनी लोकांना कधीही जाणवू दिली नाही.
तर प्रशासकीय अधिकारी ही सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊ शकतात हे सुंदर उदाहरण योगेश पाटील यांनी दाखवून दिले आहे. फक्त अधिकारी पदाचा आव नआणता कामांची कागदोपत्री पुर्तत: पाहून व प्रशासन व सामाजिक कामाची गरज याची सांगड घालत प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी शिराळा शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. शहरातील लोकांच्या अडीअडचणीपाहून नियमानुसार कामांना योग्य न्याय दिला जात आहे.
काही महीण्यांवर शहरातील नगरपंचायत निवडणुका आल्या आहेत‌‌. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या नगरपंयतीवर प्रशासक आहेत
आमदार मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी शिराळा नगरपंचायतला मिळाला शहरातील मुख्य बाजारपेठेपासून गल्ली बोळापर्यंत अनेक विकासाची कामे मार्गी लागली‌‌ आहेत. याच धर्तीवर मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांनी ही शिराळा शहराची वाटचाल सुधारीत करण्यावर भर दिला आहे.
तसेच शहरांमध्ये माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शिराळा शहरांमधील नागकट्यावर विविध औषधी वनस्पतींची लागवड वसुंधरा उद्यानाची आकर्षक निर्मिती केली आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक आड कालबाह्य झाले होते. या आडातील कचरा काढून या आडावर कारंजे बसवून शिराळा शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. तसेच शहराबाहेर रस्त्याकडेला वृक्षलागवड, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहराच्या स्वच्छतेला अधिकाधिक प्राधान्य, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूं प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन करत येथील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते कायमच प्रयत्नशील असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!