ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी ऊस माहिती केंद्राचा लाभ घ्यावा: युनिट हेड संतोष कुंभार

Spread the love

कोकरुड/वार्ताहर

शेतकऱ्यांनी दालमिया भारत शुगर युनिटच्या माध्यमातून सुरू केलेल्या ऊस माहिती केंद्राचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी केले. ते सोंडोली ता. शाहूवाडी येथे दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी व साॅलिडरिडॅड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ऊस माहिती केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी दिल्ली येथील साॅलिडरिडॅड संस्थेचे डॉ.आलोक पांडे, बायर कंपनीचे संजय नारंग यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना कु़ंभार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतीमध्ये
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये योग्य तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक उत्पादन घेता यावे याकरिता विविध प्रकारची माहिती डिजिटलचित्रा द्वारे लावण्यात आली आहे. तसेच येथे तज्ञ ऊस विकास अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन
शाश्वत शेती करावी.या अभिनव उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना ऊस शेतीतज्ञ डॉ.आबासाहेब साळुंखे म्हणाले की, जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी तसेच ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीचा योग्य मशागत करणे आवश्यक आहे. यासाठी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान ,पाणी व खतांचा कार्यक्षम वापर, एकात्मिक कीड , रोग नियंत्रण ,उसाचा पाला काढण्याची योग्य पद्धत अवलंबिली पाहिजे. ऊस संख्या नियोजन, जैविक खते व कीटकनाशके यांचा योग्य वापर केल्यास शेतकरी अधिकाधिक उत्पन्न निश्चितच साधू शकेल.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ऊस माहितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बायर कंपनी मार्फत फवारणीसाठी सेफ्टी किडचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या कार्यक्रमास दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे एच.आर. हेड महेश कवचाळे, ॲडमिन ऑफिसर शिवाजी पाटील,शेती अधिकारी मनोहर मिसाळ, ऊस विकास अधिकारी युवराज चव्हाण,
गणेश साळुंखे, सोंडोलीचे सरपंच भीमराव पाटील, निवृत्ती नायकवडी गट ऑफिसचे गोरख पाटील, संजय पाटील, विठ्ठल पाटील, किशोर लेंगरे, भगवान गायकवाड आदींसह कारखान्याचे सर्व अधिकारी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!