ताज्या घडामोडी

सर्वजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या सेवाभावी वृत्तपत्रीय अपूर्व सामाजिक कार्याबद्दल भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्ड जाहीर

Spread the love

महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे 9मार्च 2022रोजी राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे.अशी माहिती भारत सरकारचे नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या, डाॅ.विशाखा स्मृती सोशल फाऊंडशेन,नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. मनिष गवई ( अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठ,राज्यपाल निर्देसित सिनेट सदस्य ) यांनी जाहीर केले आहे.

 

अकलूज :सर्वजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या सेवाभावी वृत्तपत्रीय अपूर्व सामाजिक कार्याबद्दल भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सलन्स राष्ट्रीय अवार्ड जाहीर झाला आहे.महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे 9मार्च 2022रोजी राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार. अशी माहिती भारत सरकारचे नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या, डाॅ.विशाखा
स्मृती सोशल फाऊंडशेन,नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. मनिष गवई ( अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठ,राज्यपाल निर्देसित सिनेट सदस्य ) यांनी जाहीर केले आहे.
डाॅ.विशाखा सोशल फाऊंडेशन नवी दिल्ली, दिप फाऊंडशेन नवी दिल्ली, एमए्सवाय फाऊंडशेन नवी दिल्ली ,वाल्मिकी फाऊंडशेन नवी दिल्ली, यांच्या वतीने आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने देशातील मान्यवर विशेष सामाजिक कार्याची बांधिलकी जपण्यासाठी सतत अग्रभागी असणा-या संस्थांचे प्रतिनिधी, सेवाकर्मींना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्यासचे भारत सरकारचे नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडियाच्या, डाॅ.विशाखा
स्मृती सोशिल फाऊंडशेन,नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. मनिष गवई ( अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठ,राज्यपाल निर्देसित सिनेट सदस्य ) यांनी जाहीर केले आहे.
गत 48 वर्षा पासून पत्रकार भाग्यवतं लक्ष्मण नायकुडे(संस्थापक संपादक, अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता,aklujvaibhav.in, तालुका प्रतिनिधी, दैनिक शिवनिर्णय, सोलापूर, सातारा, रायगड जिल्हा आवृत्ती) यांनी ग्रामीण भागातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील शोध पत्रकारिता या संबंधी विशेष योगदान दिले आहे असामान्य लेखन केले आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षापासून(सन 1974) भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी पत्रकार, लेखक, कवी, म्हणून लेखणी
हाती घेतली. अनेक दैनिकं, साप्ताहिकं, पाक्षिक, विविध नियतकालिकं, मासिकं, वार्षिकं, दिवाळी अंक , इत्यादींमधून विपुल लेखन केलेले आहे. समाजातील वाईट, अनिष्ट, चालीरिती,दुर्गुण यावर प्रहार केले. सामान्य लोकांना अन्याय अत्याचारी प्रवृत्तीच्या लोकांपासून वाचवून, राजकीय क्षेत्रातील नेते, पुढारी यांच्या विरुद्ध लढा दिला व ग्रामीण पत्रकारितेचा साज व बाज वाढवून प्रशासकीय पातळीवर विविध बातम्या लेख विनामूल्य उपलब्ध केले होते. पत्रकारितेतून सामाजिक कार्याची बांधिलकी जपली आहे म्हणनू नव्या पिढीला एक आदर्श समाज घडवण्याचे कामी मोठे योगदान दिलेले आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट समज आपल्या लेखनीतनू दिली.अकलूजसह, सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य स्तरावरच्या घडामोडी समजून घेऊन, प्रेरणादायक बनुन ग्रामीण भागातील सर्व सामान्य गोरगरीब महिला, पुरूष अन्याया विरोधात निर्भयपणे, निर्भीडपणे, निरपेक्ष वृत्तीने न्याय हक्काचा लढा आपल्या लेखणीद्वारे उभा केला आहे. व ग्रामीण पत्रकारीतेचा वसा समृद्ध वारसा जोपासला आहे.भाग्यवंत नायकुडे यांनी पत्रकारितेत अद्वितीय योगदान दिले आहे.
ग्रामीण भागातील समृद्ध पत्रकारितेसाठी,येत्या 9मार्च 2022रोजी नवी दिल्ली येथे जागतिक महिला दिन
सोहळ्याच्या निमित्ताने देशातील मान्यवर विशेष सामाजिक कार्या ची बांधिलकी जपणा-यांना नॅशनल एक्सलन्स अवार्ड, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, व केंन्द्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना यांना प्रदान करण्यात येणार. असे डाॅ.विशाखा सामाजिक फाऊंडशेनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी कळविलेआहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शोध पत्रकारितेच्या विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणारे अकलूज वैभव ह्या साप्ताहिकाचे संपादक श्री भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी अद्वितीय योगदान दिले आहे .सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!