ताज्या घडामोडीमावळ

विश्व संवाद केंद्र तर्फे “माध्यम संवाद परिषद” संपन्न.

प्रसार माध्यमातून चांगले विषय समाजा समोर आले नाही तर अनेक विषय, धोरणे बारगळली जातात राष्ट्रीय न्यूज चॅनल पॅनालिस्ट, प्रसिद्ध लेखक डॉ. रतन शारदा..

Spread the love

विश्व संवाद केंद्र तर्फे “माध्यम संवाद परिषद” संपन्न.प्रसार माध्यमातून चांगले विषय समाजा समोर आले नाही तर अनेक विषय, धोरणे बारगळली जातात.राष्ट्रीय न्यूज चॅनल पॅनालिस्ट, प्रसिद्ध लेखक डॉ. रतन शारदा

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १० सप्टेंबर.

विश्व संवाद केंद्र, पुणे आणि राष्ट्रपूजन मंडळ, तळेगांव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने “माध्यम संवाद परिषद” आयोजित केली गेली.’ राष्ट्रीय विचारांना प्रसारित करण्यासाठी माध्यमांची भूमिका’ यावर राष्ट्रीय न्यूज चॅनल पॅनालिस्ट प्रसिद्ध लेखक डॉ. रतन शारदा यांनी आपले मत मांडले.यावेळी रतन शारदा म्हणाले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा प्रचार पासून अनेक काळ लांब राहिला परंतु नागरिकांना संघाची माहिती होती. डॉ.केशव हेडगेवार यांनी संघ स्थापन केला त्यावेळी समाज कार्य मध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले आणि लोकांशी थेट संवाद साधला. माध्यमांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम समाजावर होत असतो. राष्ट्र निर्मितीसाठी माध्यमाचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. वामपंथी यांनी सुरवाती पासून माध्यमावर प्रभाव निर्माण करत स्वतःचा अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाश्चात्य जीवनशैली प्रसार अमेरिकेने केला. तर रशिया, चीन देशांनी कमुनिस्ट विचार रुजवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो पुढे टिकू शकला नाही. संस्कृतीला जोडून जर्मन लोकांनी आम्ही श्रेष्ठ असल्याचे अनेक काळ दर्शवण्याचा प्रयत्न केला.

प्रसार माध्यमातून चांगले विषय समाजा समोर आले नाही तर अनेक विषय, धोरणे बारगळले जातात. सत्तेत आल्यावर केंद्र सरकारने अनेक मूलभूत गोष्टीबाबत धोरण राबविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र मधील दुरवस्था झालेले किल्ले, वास्तू याची डागडुजी होणे गरजेचे आहे. आपल्या ऐतिहासिक गोष्टी टिकवून त्याची माहिती पुढील पिढीस देणे आवश्यक आहे. महापुरुष यांना जातीत विभागणी करणे चुकीचे आहे. भारताने जगात राष्ट्र संकल्पना मांडताना सर्वांना सोबत घेण्याचा विचार मांडला. इस्लाम आणि कमुनिस्ट राजवटीपेक्षा वेगळा विचार जगासमोर आणला. भारताने संस्कृती माध्यमातून कुटुंब व्यवस्था आणि संस्कार जगाला दाखवून दिले.

तरुणांना आपला विषय पोहचवण्यासाठी नवीन पद्धतीचा वापर करावा लागेल तरच ते पुढे जाऊ शकतील. विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी परंपरेचा उपयोग योग्य प्रकारे परंपरा टिकवणे आणि राष्ट्र निर्मितीसाठी झाला पाहिजे. राष्ट्र विरोधी विचार आणि त्यांचे चुकीचे अजेंडा बाजूला करण्यासाठी आपली बाजू ठामपणे मांडून संवाद साधने महत्वाचा आहे. नवीन सोशल मीडियाचा वापर करून सकारात्मक गोष्टी पुढे येव्यात.

 

यावेळी राष्ट्र पूजन मंडळाचे अधिकारी हेमंत दाभाडे, विश्व संवाद केंद्राचे अधिकारी मंगेश फल्ले हे उपस्थित होते व विकास फडके यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीकांत मेढी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!