ताज्या घडामोडी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समितीच्या ग्रुपवरील आदरणीय सर्व कर्तृत्ववान महिलांना ऑनलाईन”सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत

Spread the love

बदलापूर-महिला या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत,घरातील कर्तव्यदक्ष गृहीणीही वर्षाचे३६५दिवस कार्यरत असते.अशा अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.तसेच जनजागृती सेवा समितीच्या व्हाटसपग्रुवरही व्यावसायिक,नोकरदार,सामाजिक संस्थांच्या अध्यक्षा,कर्तव्यदक्ष गृहीणी, अभिनेत्री, शिक्षिका,समाजसेविका,डाॅक्टर,कायदेविषयक सल्लागार,विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, साहित्यिक,लेखिका,गायिका,कवियत्री,कला,क्रीडा,सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला कार्यरत आहेत.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून” *जनजागृती सेवा समिती,* महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्यावतीने ग्रुपवरील सर्व सन्माननीय महिलांना *ऑनलाईन”सन्मानपत्र* “देऊन गौरवांकीत करण्यात आले.त्यांच्या पर्सनल व्हाटसपवर नंबरवर सन्मानपत्र पाठविण्यात आले. *८मार्च जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो* ,गृहीणी म्हणून ३६५दिवस काम करत असताना आपण इतर विविध क्षेत्रात त्याच उर्जेने कार्यरत अहात,याचा जनजागृती सेवा समितीला सार्थ अभिमान आहे.ग्रुपवरील तुम्हा सर्व महीलांना हे सन्मानपत्र देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.जागतिक महिला दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा,सर्व महिला ग्रुप सदस्यांना जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडुन’सन्मानपत्र’देऊन सन्मानित केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष,सर्व पदाधिकारी ,कार्यकारिणी सदस्य, सल्लागार यांच्यावतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!