क्रीडा व मनोरंजन

कल्याण डोंबिवलीत रंगणार १४ वर्ष वयोगटाची मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा

Spread the love

डोंबिवली : क्रिकेट इन्स्टिट्युशन ऑफ डोंबिवलीतर्फे १४ वर्षाखालील मुलांसाठी मर्यादित २५ षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निळजे येथील संत मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावर ९ मेपासून रंगणऱ्या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रथम येणाऱ्या १२ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. या संघाची तीन गटात विभागणी करुन प्रत्येक संघाला तीन साखळी सामने खेळावे लागतील. त्यानंतर प्रत्येक गटातील पाहिले दोन संघ असे एकूण सहा संघातील सरस धावगती असणाऱ्या चार संघामध्ये उपांत्य फेरीच्या लढती खेळवण्यात येतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमावलीप्रमाणे स्पर्धेतील विजेते, उपविजयी संघ, सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज,क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकाविरास सन्मानचिन्ह आणि आकर्षक उपयोगी भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघानी धनंजय चाळके यांच्याशी ८६९३०८५५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!