ताज्या घडामोडी

कुंडल सोसायटीच्या इमारतीचे उदघाटन संम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कुंडल (ता. पलुस) येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन व सोसायटीच्या खत गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन आज (ता. 19) रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून संपन्न झाले. यावेळी क्रांती उद्योग समुहाचे अध्यक्ष, आमदार अरूणअण्णा लाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरणतात्या लाड, सांगली जिल्हा परिषदेचे गट नेते शरद लाड, सरपंच प्रमिलाताई पुजारी, पंचायत समितीचे उपसभापती अरूण पवार, सोसायटीचे अध्यक्ष विनोद देशमुख, दिनकर लाड, सुबरावदादा, कुंडलीक येडके, वसंतराव लाड, श्रीकांत लाड, विक्रांती लाड व रणजीत लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!