ताज्या घडामोडी

ध्येय निश्चित केल्यास कष्टाच्या बळावर यश संपादन करता येते….पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने

Spread the love

मायक्रोकॉम संस्थेच्या वतीने डॉ. आयेशा व डॉ. खुतेजा यांचा सत्कार

मुरुम, ता. उमरगा, (प्रतिनिधी) :
आजही अल्पसंख्याक समाजात शिक्षणाविषयी मोठया प्रमाणात उदासीन असून मुलींनी चार भिंतीच्या बाहेर येऊन शिक्षण घेणे गरजेचे आहे. डॉ. आयेशा व डॉ. खुतेजा या बहीणींनी प्रतिकुल परिस्थितीत वैद्यकिय शिक्षण घेऊन यश संपादन केले. हे इतरांसाठी मोठी अभिमान व अनुकरणीय बाब आहे. ध्येय निश्चित केल्यास कष्टाच्या बळावर यश संपादन करता येते असे मत पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने यांनी व्यक्त केले.
मायक्रोकॉम संगणक संस्थेच्या वतीने शुक्रवारी (ता.२०) रोजी नुकतेच वैद्यकिय पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केलेल्या डॉ. आयेशा जमादार व डॉ. खुतेजा जमादार यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी पोहेकॉ. सुनिता राठोड, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
उमरगा येथील सर्वसामान्य कुटूंबातील आयुब जमादार यांच्या कन्या खुतेजा व आयेशा या एम.बी.बी.एस.च्या वैद्यकीय पदवीच्या अंतिम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन करून एकाच कुटूंबातून दोन सख्या बहीणी डॉक्टर होण्याचा मान मिळविला. खुतेजा व आयेशाचे वैद्यकीय शिक्षण जामीया ईस्लामिंया ईशातूल ऊलुम इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्स, जालना येथे झाले असून दहावीपर्यंतचे शिक्षण कै. शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा येथे झाले. ११ वी व १२ वी चे शिक्षण लातूर येथील त्रिपुरा महाविद्यालय (रिलायन्स कॉलेज) येथे झाले असून नीटमध्ये दोन्ही बहीणींनी यश मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. वडील अयुब जमादार यांची कौटूंबीक परिस्थिती अतिशय प्रतिकूल असून सुद्धा दोन्ही मुलींना वैद्यकीय शिक्षणासाठी पाठबळ दिले. दोन्ही बहीणींनी वडीलांनी टाकलेल्या विश्वासास तडा जाऊ न देता यश संपादन केले. डॉ. आयेशा व डॉ. खुतेजा यांनी त्यांचे चुलते तथा एम.आई.टी. मेडीकल कॉलेज लातूरचे डीन डॉ. एन.पी.जमादार यांची प्रेरणा घेतली व त्यांचे दोघांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
घरी कोणत्याच सुविधा नसताना कष्टाच्या बळावर खुतेजा व आयेशांनी ध्येय साध्य करुन विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. यावेळी डॉ. खुतेजा, डॉ. आयेशा यांनी आपले अनुभव विषद केले. कु. शिल्पा जाधव, रऊफशा मुर्शद, अविनाश खवडे, स्वागत धुरे यांनी यासाठी पुढाकार घेतला. प्रा. मुल्ला यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!