ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील* *संशोधनाकडे वळावे : प्रा. डॉ.प्रदीप सरवदे

Spread the love

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

(दि. ८) मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रदीप सरवदे यांचे नुकतेच येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये अतिथी व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच विज्ञान शाखेतील सर्व विभागांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान त्यांनी महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या संख्याशास्त्र विभागाची संगणक प्रयोगशाळा, विद्यार्थी संख्या तसेच पुरेसा शिक्षक वर्ग पाहून समाधान व्यक्त केले. डॉ. सरवदे हे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी येथून भौतिकशास्त्र विषयातील बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी तर दक्षिण कोरिया मधून डाॅक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेट या संशोधन पदव्या मिळविल्या आहेत. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपले महाविद्यालयीन अनुभव कथन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) एम.के. पाटील, डॉ. एस.एस. शेंडगे, नॅक समन्वयक प्रा. अविनाश कांबळे, संख्याशास्त्र विभागातील प्रा. विजय कोष्टी, प्रा. गणेश सातपुते, प्रा. शीतल पाटील , प्रा. प्राजक्ता पाटील आणि बी.एस्सी. भाग तीन चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!