ताज्या घडामोडी

दिनदयाळच्या कार्यस्थळावर कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

Spread the love

महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे (आप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि इस्लामपूरच्या कार्यस्थळावर आज १ मे कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त विजयभाऊ पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर चे चेअरमन मा.श्री. संदिप विजयभाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री. बजरंग कदम यांनी केले.‌ प्रमुख पाहुणे श्री. संदिप पाटील यांचा संस्थेच्या वतीने जनरल मॅनेजर श्री. विनोद देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सूतगिरणी चे संचालक डॉ. शिवाजी जाधव, राजेंद्र लोंढे, मंगेश लवटे तसेच फायनान्स मॅनेजर श्री. राजेंद्र मिरजे, प्रोडक्षण मॅनेजर श्री. सुर्यकांत देसाई,लेबर ऑफिसर श्री. अदित्य यादव, इंजिनिअरिंग मॅनेजर श्री. एस. आय. मेत्री, मेंटेनन्स मॅनेजर श्रीहरी कुंभार, एक्साईज ऑफिसर डी. एस. पाटील, राजेंद्र खोत यांच्या सह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत जाधव, विजय कवठेकर, सुहास पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!