आपला जिल्हासामाजिक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा कधी उभारणार ?

महाराष्ट्र मातंग समाजाकडून लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा...

Spread the love

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा कधी उभारणार,महाराष्ट्र मातंग समाजाकडून लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा…When will the statue of democrat Anna Bhau Sathe be erected, Maharashtra Matang Samaja strike on Lonavla Municipal Council…

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी २४ मे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दलितांसाठी आपले आयुष्य पणाला लावले.लोणावळा नगरपरिषद आवारात अनेक महापुरुषांचे पुतळे लावण्यात आले परंतु अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा नसल्याने मागील वर्षापासून महाराष्ट्र मातंग समाजाच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेस निवेदन देऊन विनंती करण्यात आली आणि त्यासाठी लोणावळ्यातील शहरातील इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले सहमत नोंदविले तरी अद्याप लोणावळा नगरपरिषदेकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारणीस विलंब होत आहे.

तसेच सिद्धार्थ नगर येथील अण्णा भाऊ साठे वसाहतीचा नाम फलक असणारी कमान नगरपरिषदेने अद्याप लावलेली नाही यासाठी आज सकल महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.यावर लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी या विनंती वर मौन राखत अण्णा भाऊ साठे वसाहतीची कमान लावण्यासाठी काही स्थानिकांचा विरोध असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.

स्थानिकांचा विरोध हा बिनबुडाचा असल्याचे मत यावेळी सोमनाथ बोभाटे व अशोक बोभाटे यांनी व्यक्त केले तसेच लोणावळा नगरपरिषदेने लवकरात लवकर लोकशाहीर अण्णा के यांचा पुतळा नगरपरिषद इमारतीच्या आवारात अशी विनंतीही करण्यात आली.

यावेळी मातंग समाज लोणावळा शहर अध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे, उपाध्यक्ष विकास साठे, पुणे जिल्हा कोर कमिटी लहुजी शक्ती सेना अध्यक्ष अशोक बोभाटे, शाम बोभाटे, कृष्णा साबळे, कार्याध्यक्ष विजय साबळे, उदय बोभाटे, महर्षी वाल्मिक समाज उपाध्यक्ष विकी उटवाल, सुनील बोभाटे, मधुकर बोभाटे, बाळू बोभाटे,आकाश लोंढे,निलेश लांडगे, सुधीर साबळे, विश्रांत साठे योगेश पाटोळे, रितेश बोभाटे, शुभम खुडे, सागर बोभाटे, सुरेश बोभाटे, भारती चांदणे, आशाताई साबळे, शांताबाई भालेराव, अरुणाताई बोभाटे, आशाताई पवार, शारदाबाई जवळकर ज्योतीताई साबळे, राणी बोभाटे, आदींसह कार्यकर्ते व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!