ताज्या घडामोडी

क्रांतिरत्न सोशल फौंडेशनचे शाहू गौरव पुरस्कार जाहीर

Spread the love

इचलकरंजी-कोरोची येथील क्रांतिरत्न सोशल फौंडेशनच्या च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय छ. शाहू गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यामध्ये आदर्श माता, जीवन गौरव, वैद्यकीय सेवा, समाज रत्न, समाज भूषण, कृषिरत्न आदी पुरस्कारांचा समावेश आहे सदरचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 8मे 2022 रोजी दुपारी 2 वाजता ना.बा. घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी याठिकाणी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष उत्तम शिवाजी हुजरे यांनी दिली यामधे शांती मुळिक नवी मुंबई ‌(आदर्श माता), डॉक्टर तुषार भोसले कागल (धनवंतरी भूषण), संतोष सावंत इचलकरंजी (समाज रत्न), संजय मेटे इचलकरंजी (श्री उद्योगरत्न) डॉ. अशोक काजवे हॉस्पिटल इचलकरंजी (वैद्यकीय सेवा रत्न), डॉक्टर प्रमोद भोई वडगाव (आरोग्यसेवा भूषण), अण्णासो गोटखिंडे , यळगुड (कृषिरत्न), मच्छिंद्र जाधव पट्टणकोडोली (उद्योगरत्न), संन्मती दूध उत्पादन केंद्र कोरोची (उत्कृष्ट दूध संस्था), शीला पाटील हिंगणगाव (आदर्श सरपंच), श्रेणिक पाटील सांगली (समाज रत्न), महालक्ष्मी पतसंस्था कोरोची (आदर्श सहकारी पतसंस्था), लॉर्ड जिव्हेश्वर इंग्लिश स्कूल शहापूर (उत्कृष्ट शिक्षण संस्था), सुधारणी पाटील कबनूर (सामाजिक सेवा), शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी (समाजरत्न), अनिल कमते घोसरवाड ( उत्कृष्ट अभियंता), प्रियांका पाटील नवी मुंबई (उत्कृष्ट साहित्यिका) डॉक्टर अनिल मडके सांगली (आरोग्य रत्न), महेश कोरवी कोरोची (श्री उद्योजक), एडवोकेट सदाशिव भेंडवडे हातकणंगले (उत्कृष्ट वकील), संभाजी पाटील कोरोची (समाज रत्न), यांच्यासह अनेक सामाजिक कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी खासदार धैर्यशील माने, आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजू बाबा आवळे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील सांगली, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे, इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपमहाराष्ट्र केसरी अमृत भोसले, नगरसेवक अमरजीत जाधव, युवा नेते सतीश मुळीक, मराठा महासंघ अध्यक्ष संतोष सावंत, संतोष अण्णा कुपटे , यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष उत्तम शिवाजी हुजरे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!