आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष. किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन विभागात दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती मिठाईचे वाटप..

दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती मिठाईचे वाटप करून नागरिकांना दीपावली निमित्त. मा.नगरसेवक रोहित लांघे, यांच्यातर्फे, शुभेच्छा देण्यात आल्या.

Spread the love

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष. किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावलीच्या मुहूर्तावरती मिठाईचे वाटप..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे (स्टेशन) २४ ऑक्टोबर.

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन विभागात दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती मिठाईचे वाटप करून नागरिकांना दीपावली निमित्त. मा.नगरसेवक रोहित लांघे, यांच्यातर्फे, शुभेच्छा देण्यात आल्या.

दीपावली हा उत्साहवर्धक प्रेरणादायी व चैतन्य निर्माण करणारा सण म्हणून सर्वत्र साजरा केला जातो आजूबाजूला दिव्यांचा जल्लोष होत असताना मनामधील अंधकार दूर होऊन उत्साहाची नवचेतना निर्माण व्हावी यासाठी जनसेवक समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत असे नगरसेवक रोहित लांघे यांनी यावेळी नमूद केले.

जनसेवा जेष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला. दरवर्षी न विसरता किशोर आवारे आम्हा सर्व नागरिकांना एकत्र घेऊन दिवाळी साजरी करतात हे त्यांच्यामधील एक असामान्य कर्तुत्व असून त्यांना आम्ही आमच्या कुटुंबातीलच एक घटक मानतो; असे वक्तव्य जनसेवा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय साबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!