ताज्या घडामोडी

श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर चे दीपावली पाडव्यानिमित्त १ कोटी २५ लाख ठेवी संकलन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
पतसंस्थेच्या इस्लामपूर, शिराळा, औदुंबर व सागाव शाखेने केला उच्चांकी विक्रम
औदुंबर व सागाव या ग्रामीण भागातील शाखांनी देखील ठेव कलेक्शन मध्ये ठेव संकलन मध्ये अतिशय कामगिरी करून अनुक्रमे २० लाख इतक्या ठेवींचं संकलन केलं आहे या दोन्ही गावांमध्ये बाजारपेठा नसून देखील फक्त शेतकरी वर्गाच्या ठेवी स्वीकारून एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे पतसंस्थेच्या इस्लामपूर शाखेने ४३ लाख शिराळा शाखेने ४२ लाख औदुंबर शाखेने वीस लाख सागाव शाखेने २० लाख याप्रमाणे एकूण एक कोटी २५ लाखाचं ठेव संकलन केले आहे..
सध्याच्या काळात नैसर्गिक आपत्तीचा काळ असून दोन वर्षांपूर्वी महापूर त्यानंतर कोरोना यासारखी नैसर्गिक आपत्ती आली संपूर्ण जग थांबलं गेलं साऱ्या जगाची अर्थव्यवस्था कोलमडले समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढतच गेली. या काळात देखील महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त केलेली सांगली सातारा व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेली श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था न डगमगता वैभवशाली वाटचाल सुरू ठेवलेले आहे
यानिमित्त पतसंस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. पी बी कुलकर्णी, पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बी टी निकम, प्रधान शाखेचे शाखा प्रमुख प्रमुख दिनेश हसबनीस, शिराळा शाखाप्रमुख सौ सुखदा महाजन, सागाव शाखेचे शाखा प्रमुख सुमंत महाजन, पतसंस्थेच्या माजी चेअरमन श्रीमती सुनिता कुलकर्णी आणि संचालक सर्वश्री अमित कुलकर्णी, सोमाजी कोळेकर, सुमंत कुळकर्णी, दिलीप फल्ले, उदय डफळापुरकर, कार्यलक्षी संचालक संजय हिरवे, संस्थेचे सेवक वर्ग आणि धनवर्धिनी एजंट या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!