क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्रात दोन-दोन राष्ट्रीय खो-खो स्पर्धांची मेजवानी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, दि. १ मे (क्री. प्र.), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने खोखोचा वेग वाढवताना राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देताना राष्ट्रीय खो-खो महासंघाने महाराष्ट्राला पुरुष-महिला (खुला गट) व १४ वर्षाखालील किशोर किशोरी (सब जूनियर) अशा दोन राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याची संधी दिली आहे.

५५ वी पुरुष-महिला (खुला गट) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा उस्मानाबाद येथे नोव्हेंबर २०२२ च्या शेवटच्या पंधरवड्यात तुळजाभवानी स्टेडियम वर आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. ही स्पर्धा आयोजित करताना खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी अतिशय नेटकेपणाने व सुंदर नियोजनाखाली आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

३२ वी किशोर-किशोरी (सब जूनियर – १४ वर्षाखालील) राष्ट्रीय खो-खो स्पर्धा शेवगाव येथे प्रवारा मेडिकल ट्रस्टच्या बाळासाहेब विखे पाटील सीबीएसई शाळेच्या सहकार्याने ओक्टो २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करणार असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा यांनी कळविले आहे.

खरंतर गेल्या वर्षीच एखादी राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित केली जाणार होती मात्र कोविड परिस्थितीमुळे त्या वेळी स्पर्धा घेणे शक्य झाले नसल्याचे डॉ. चंद्रजीत जाधव व गोविंद शर्मा यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!