ताज्या घडामोडी

प्राध्यापकांनी मार्गदर्शनातून समाजास दिशा दाखवावी-गोविंद काळे

Spread the love

प्रबोधनातून समाज परिवर्तनाच्या पवित्र उद्दिष्टाने प्रेरित होऊन धनगर प्राध्यापक महासंघाच्या महिला आघाडी* द्वारे आयोजित व्याख्यानमालेचे सातवे पुष्प सोलापूर येथील साहित्यिक व कवी गोविंद काळे* यांनी गुंफले. दिनांक 20 जानेवारी 2022 गुरुवार रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर प्राध्यापक महासंघाच्या कोल्हापूर येथील सदस्या *प्रा. डॉ. शशिकला सरगर यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय धनगर प्राध्यापक महासंघाच्या सदस्या *प्रा. सुचित्रा रत्नपारखी* यांनी करून दिला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर प्राध्यापक महासंघाच्या महिला आघाडीच्या रायगड-मुंबई जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षा *प्रा. डॉ. सुनिता तिडके* होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर प्राध्यापक महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा *प्रा. डॉ.रत्नमाला वाघमोडे* यांनी केले तर आभार धनगर प्राध्यापक महासंघाच्या सदस्या *प्राचार्या श्रीमती अर्चना नागे* यांनी मानले.
लेखकांच्या दृष्टिकोनातून धनगर समाज या विषयावर आपले मत व्यक्त करताना प्रसिद्ध साहित्यिक व कवी गोविंद काळे यांनी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर लिहिलेल्या साहित्याचा व कवितांचा समर्पक दाखला देत उपस्थित समाज बांधवांचे प्रबोधन केले. साहित्यिक गोविंद काळे यांनी लोककल्याणकारी व शौर्याची एका वर्षात साडेतीनशे पानांची राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वावर *सार्थ अहिल्यागाथा* लिहिलेली असून इतिहासात एकही युद्ध न हरलेले अपराजित राजे श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर *महायोद्धा* ही कादंबरी लिहिली केलेली आहे. त्यांच्या *धरण* या काव्यसंग्रहातील 43 कवितांपैकी काही निवडक कविता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कवी गोविंद काळे यांचे अभंगांवर प्रभुत्व असून त्यांनी धनगर समाजाला धनगर समाजावर निर्मित साहित्याचे वाचन करण्याचा मोलाचे आवाहन या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या निमित्ताने दिला आहे. अभंग, कविता, उखाणे, इ. साहित्यकृतीतून यांचा श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात मा. विजय शेंडगे, मा. संभाजी काळे, इ. मान्यवरांनी वक्त्यांना प्रश्न विचारून चर्चा घडवून आणली.
या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ, उपाध्यक्षा प्रा. डॉ. संगीता चित्रकोटी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानदेव काळे, सचिव प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, सहसचिव प्रा. डॉ. धनराज धनगर, सहसचिव प्राचार्या संगीता पुंडे, तसेच धनगर प्राध्यापक महासंघाचे सर्व पदाधिकारी सातत्याने कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले जात असून ही सर्व व्याख्याने लवकरच युट्युबवर श्रोत्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पुढील व्याख्यानांचा लाभ आपण गुरुवारी सायंकाळी 6 वाजता गुगल मीटच्या खालील लिंकवर घेऊ शकता: https://meet.google.com/vnp-bdgf-ism

प्रा. डॉ. अतुल सुर्यवंशी
सचिव
धनगर प्राध्यापक महासंघ म. रा.
मो. 9823197358

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!