ताज्या घडामोडी

किल्ले शिराळा भुईकोट स्वच्छता आणि दुर्गसेविका सन्मान सोहळा पार

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सह्याद्री प्रतिष्ठान सांगली विभागामार्फत शिराळा भुईकोट किल्ला स्वच्छता मोहीम दुसरी पार पडली.
प्रामुख्याने महिला दिन विशेष दुर्ग सेविका सन्मान सोहळा देखील शिराळा भुईकोट किल्ल्यवर घेण्यात आला.

महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेऊन दुर्ग संवर्धन काळाची गरज आहे , हे समजून घेतले.
आपल्या सोबत खांद्याला खांदा लावुन काम काम करणाऱ्या दुर्ग सेविका समाजातील प्रत्येक घटका चा सन्मान करत असतात पण त्यांच्या या कार्याचा सन्मान देखील झाला पाहिजे म्हणून हा उपक्रम पार पडला.सह्याद्री प्रतिष्टान हिंदुस्थान घेतला वसा दुर्ग संर्वधनाचा माहिला दिन कार्यक्रम व सन्मान पौर्णिमा पाटील, सौ अनिता धस, सौ. सुनंदा सोनटके माजी नगराध्यक्ष, स्वप्नील नलावडे, राजश्री सोळसे, अनुसया पाटील, पुनम पाटील, निशा पवार, स्वाती भसमे , वैष्णवी पाटील यांच्या सन्मान करण्यात आला प्रमुख उपस्थितीत वनक्षेत्रपाल सचिन जाधव व सौ. सुनंदा सोनटके माजी नगराध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

मोहिमेत किल्यावर स्वच्छता करण्यात आली.बुरुजांवर वाढलेली झाडी आणि झुडपे काढून बुरुज रिकामे केले
स्वच्छता दृष्टीने काय कामे करण्यात येतील ह्याचे नियोजन करण्यात आले. वन विभाग अधिकारी यांनी मार्गदर्शन करून लागेल ती मदत करण्याचे मानस बोलून दाखवला.

दुर्गदर्शन मोहिमेत 150 दुर्गसेवकांनी सहभाग घेतला होता.अगदी बेळगाव मधून तरुणींनी सहभाग नोंदवला.
या मोहिमेत सांगली जिल्ह्यातील सहयाद्री चे दुर्ग सेवक व खास करून बेळगांव हून मोहिमे साठी आले होते येथील १५० दुर्गसेवक आणि दुर्गसेविका यांचा सहभाग होता.

प्रशांत कुंभार, दादुस मानकर, निखिल जाखले, विनायक बांदल बंटी नांगरे अतुल खोत, पूनम पाटील, विशाल लाहीगडे, स्वन्पाली पाटील, पौर्णिमा पाटील, दिग्विजय सुरले, सुरज शेखर, किरण सावंत, प्रहार चे बंटी पाटील, सनी आवटे यांचे विशेष सहकार्य लाभले वनक्षेत्रपाल सचिन जाधव व दिनेश हसबनीस सर यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व सहभागींना शिराळा भुईकोट विषयी तसेच सह्याद्रीच्या कार्या बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली शिव प्रेरणा मंत्र घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.प्रशांत कुंभार,सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगली जिल्हा सह प्रशासक यांनी ह्या मोहीमेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!