ताज्या घडामोडी

राज ठाकरे व शिरीष पारकर यांना पुन्हा शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

आज शिराळा येथे 14 वर्षांपूर्वी शेडगेवाडी येथे झालेल्या आंदोलनाबाबत मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत वगैरे दहा यांची शिराळा येथील फौजदारी न्यायालयात आज चौकशीसाठी तारीख होती. मागील तारखे वेळी सर्वच दहा आरोपींना माननीय न्यायाधीश प्रीती श्रीराम यांनी अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. परंतु सदरचा हुकूम झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये राज ठाकरे व शिरीष पारकर यांचे बाबत माननीय सेशन कोर्टात कोर्टात दोष मुक्तीसाठी रिविजन अर्ज न्यायप्रविष्ठ आहे, तसेच त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माननीय न्यायालयात हजर राहण्याचा आदेश आहे याचा विचार होऊन न्यायाधीश श्रीराम यांनी या दोघांच्या बाबतचे अजामीनपात्र वॉरंट रद्द केले होते.
आज नेमल्या तारखेला इतर आरोपींनी प्रत्येकी रक्कम रुपये ₹1000/- भरल्यानंतर त्यांचे विरुद्ध चा वॉरंटचा आदेश रद्द करण्यात आला.
राज ठाकरे हे आजारी आहेत तर शिरीष पारकर हे बाहेर गावी गेले आहे असा अर्ज माननीय न्यायाधीशांसमोर आल्यानंतर माननीय न्यायाधीश प्रीती श्रीराम यांनी मागील तारखेचा आदेश या दोघांनी पाळलेला नाही.दोघेही आज रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे गैरहजर आहेत. तसेच राज ठाकरे आजारी असल्याबाबतचा कोणताही कागदपत्रे पुरावा सादर केलेला नाही.सदरची केस गेल्या 14 वर्षापासून न्यायप्रविष्ठ आहे. 15 ऑक्टोबर 2022 रोजी या दोघांचे विरुद्धचा दोघांनी केलेला दोष मुक्तीचा अर्ज या न्यायालयाने नामंजूर केलेला आहे. त्यानंतर देखील वारंवार हे दोघे न्यायालयासमोर गैरहजर आहेत असे आदेशात नमूद करून राज ठाकरे व शिरीष पारकर या दोघांचे विरुद्ध पुन्हा अजामीन पत्र वॉरंटचा आदेश काढला. अशी माहिती या खटल्यातील विधीज्ञ ॲड.रवि पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!