महाराष्ट्र

7 ऑक्टोबर पासून श्री तुळजा भवानी शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार

Spread the love

 

सोलापुर : येत्या 7 ऑक्टोबर पासून अवघ्या महाराष्ट्राचे  कुलदैवत असणा-या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे.

7 ऑक्टोबर ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने घटस्थापनेच्या दिवशी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना व घटस्थापना करण्यात येईल. घटस्थापनेनंतर दस-यापर्यंत देवीची नित्योपचार पूजा करण्यात येईल. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन कार्यक्रम साजरा करण्यात येईल.

19 ऑक्‍टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक विधी केले जातील. तर 20 ऑक्टोबरला सोलापूर काठ्यासह छबिना व जोगव्याचा कार्यक्रम होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!