ताज्या घडामोडी

दानोळी उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विपुल भिलवडे यांनी मारली बाजी..

Spread the love

दानोळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या लढतीत विपुल भिलवडे विजयी झाले..निवडणूक सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ सुनिता वाळकुंजे होत्या.काँग्रेसचे दानोळी गावचे जेष्ठ नेते सर्जेराव शिंदे यांनी उपसरपंच पदाच्या निवडणूकीतुन माघार घेतली.व दोन अर्ज आल्याने गुप्त मतदान घेण्यात आले.त्यामुळे विपुल भिलवडे व प्रविण उर्फ दादा खोत अशी लढत झाली.दादा खोत याना 5 तर विपुल भिलवडे यांनी 12 मते मिळवुन बाजी मारली.सुनील शिंदे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते.ग्रामविकास अधिकारी के. आर. बागुल यांनी नामनिर्देशन पत्र सादर करून घेत कागदोपत्री पूर्तता करून घेतली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिकेत भिलवडे यांनी काम पाहिले.विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.यावेळी गावातील सर्व गटनेते ,पद्धधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!