ताज्या घडामोडी

उंड्री उपकेंद्रामधे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Spread the love

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १८७व्या जयंती दिनानिमित्त उंड्री उपकेंद्रामधे अभिवादन करण्यात आले. उपकेंद्रामधील स्टाफ तसेच कोरोना लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.स्त्री ही घराचा कणा असते,त्यामुळे मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देणं ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचं उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी सांगितले.याप्रसंगी उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत जाधव,परिचारिका कविता पाटील,आशास्वयंसेविका सुनिता कळेकर,उंड्री गावातील महिला आणि मदतनीस रंजना कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!