ताज्या घडामोडी

मा. विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी

Spread the love

माध्यमिक  विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात ‘शिवजयंती’ उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम प्रशालेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री.पोतदार सर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या विषयी अतिशय सुंदर माहिती आपल्या मनोगतातून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कथन केली.श्री.जगताप सरांनी आपल्या ओघवत्या शैलीतून शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. श्री.एन.एल.जाधव यांनी स्वरचित गीत सादर केले. मा.मुख्याध्यापक श्री. पोतदार सर यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.एस.के. जाधव सरांनी केले.यावेळी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.प्रसिद्धी विभागप्रमुख -सौ. मानसी खेडेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!