ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लीगल सेल, महसूल विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी :- वकील नितीन गुलाब दसवडकर यांची नियुक्ती

Spread the love

वार्ताहर पुणे ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लीगल सेल, महसूल विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी महाराष्ट्र पत्रकार संघ पुणे जिल्ह्याचे विधी सल्लागार, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली यांचे विधी सल्लागार यांची वकील नितीन गुलाब दसवडकर यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लीगल सेल, मानव अधिकार, व माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष वकील रवी जाधव साहेब यांचेकडून टिळक भवन दादर मुंबई येथे उपस्थिती मध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले.या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, लीगल अध्यक्ष वकील रवी जाधव, माजी मुंबई उच्च नायालयाचे न्यायाधीश अभय ठिपसे, देशाचे काँग्रेस विधी विभागाच्या प्रभारी विपुल माहेश्वरी, आशिष दुवा, प्रवक्ते अतुल लोंढे, दीपक तलवार , अ नि स चे अविनाश पाटील हे उपस्थित होते.
नितीन दसवडकर हे गेली १२ वर्षांपासून पुण्यात महसूल विभागात वकिली करीत आहेत तसेच त्यांना सामाजिक कामाची आवड असल्याने महाराष्ट्र पत्रकार संघ पुणे जिल्हा, तसेच राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली यांचे विधी सल्लागार असून यांचे माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवत आहेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लीगल सेल, महसूल विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे व अभिनंदन केले जात आहे. भोर वेल्हा मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ चे संपर्क प्रमुख सिकंदर सिंह दुधनी व जिल्हा अध्यक्ष किरण जाधव यांनी दसवडकर यांचे पुढील कार्यास शुभेच्या दिल्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!