आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे : माजी नगरसेवक निखिल भगत..

यशवंतनगर, तपोधाम काॅलनी परिसरात 1 हजार राष्ट्रध्वजाचे वितरण

Spread the love

हर घर तिरंगा’ उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे : माजी नगरसेवक निखिल भगत

यशवंतनगर, तपोधाम काॅलनी परिसरात 1 हजार राष्ट्रध्वजाचे वितरण.

आवाज न्यूजः राजेश बारणे, तळेेगाव प्रतिनिधी १३ ऑगष्ट.

तळेगाव दाभाडे : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्यांचे, क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे आणि देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निखिल भगत यांनी केले.

तळेगाव दाभाडे शहरातील यशवंतनगर, तपोधाम काॅलनी परिसरातील घरोघरी जाऊन माजी नगरसेवक निखिल भगत यांच्यातर्फे 1 हजार राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. यावेळी निखिल भगत यांच्यासह निवृत्त लेफ्टनंट
अरूण पाटील, मिलिंद देशपांडे , विश्वास देशपांडे , अतुल पाटील ,चंदन कारके, रमेश पाटील, प्रकाश जोशी, निरंजन जहागीरदार, निलेश जाचक, उदय भेगडे, आदी ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

निखिल भगत पुढे म्हणाले” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या पिढीने, ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजी सत्तेविरुध्द लढा दिला आणि आपला देश पारतंत्र्यातून मुक्त केला. त्या सर्वांनी केलेल्या कामाची जाणीव  पुढील पिढीला व्हावी यासाठी ‘हर घर तिरंगा – घरोघरी तिरंगा’ हा राष्ट्रभक्तीवर उपक्रम देशात सर्वत्र राबविला जात आहे. देशाच्या या अमृत महोत्सवात यशवंतनगर, तपोधाम काॅलनीमधील नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!