ताज्या घडामोडी

धनगरांच्या वाघांनी ..एकतेच्या धाग्यांनी आक्रमक व्हा ~पत्रकार भारत कवितके.

Spread the love

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली.त्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्यात आली. संविधानाने आदिवासी श्रेणीतील एकूण ४७ जाती जमातीला सवलती दिलेल्या आहेत.परंतु ४७ जाती जमाती मध्ये ३६ क्रमांकावर धनगड चे नाव नमूद आहे.धनगड व धनगर यातील ‘ र ‘ व ‘ ड’ च्या घोळामुळे धनगर समाज सवलती पासून वंचित राहिला आहे. धनगड जातच आस्तित्वात नाही.पण धनगर जात आस्तित्वात आहे. यामुळे इतर ४६ जाती जमातींना आदिवासीं सवलती मिळतात फक्त ३६ क्रमांकावरील धनगड जाती जमातींना आदिवासीं सवलतीचा लाभ मिळत नाही.महाराष्ट्रा तील एका जिल्ह्यातून आजपर्यंत धनगड जातीला जातीचे प्रमाणपत्र दिलेले नाही.या अडचणीमुळे आजपर्यत धनगर समाजाला एस.टी.चे प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही.वरवर धनगर समाजाला एस.टी.आरक्षण मिळायलाच हवे,असे म्हणणारे सर्वच राजकीय पक्ष आतून धनगर समाजाला सवलती मिळण्या बाबत उदासिन आहेत.त्यांची मनापासून इच्छाच नाही. फक्त आणि फक्त मतासाठी धनगर समाजाला जवळ करणारे धूर्त राजकारणी निवडूण येऊन सत्ता उपभोगतात.संख्याबळाने मोठा असलेला धनगर समाज मात्र राजकारणात आमदार,खासदार निवडूण आणून आपली सामाजीक समस्या सोडवू शकला नाही. हे धनगर समाजाचे दुर्दैव म्हणायचे.जनतेच्या बळा शिवाय धनगर समाजाचे खासदार,आमदार सभागृहात समाजाचे प्रश्न ,समस्या मांडूच शकत नाहीत,त्यांना छातीठोकपणे समाजाच्या समस्या सोडविता येत नाहीत.व सताधारी त्यांची दखल गांभिर्याने घेत नाहीत.त्यासाठी धनगर समाज बांधवानी सत्तेत आपले खासदार, आमदार भरघोष मतांनी व जास्ती जास्त संख्येने पाठवा.व आपले राजकीय वर्चस्व वाढविणे गरजेचे आहे. सत्तेत आपल्या समाजाच्या संख्याबळा याप्रमाणात का होत नाहीत.? यांची कारणे शोधून काढली पाहिजेत.प्रत्यक्षपणे कृती झाली पाहिजे.आरक्षण अमंलबजावणी, १००० कोटीच्या २२ योजना लागू करणे,घरकुल योजना,शिष्यवृत्ती,शेळीमेंढी महामंडळाचा निधी,चराऊ कुरणे,अहमदनगरचे अहिल्यानगर करणे,वगैरे वगैरे आपल्या समाजाच्या प्रामुख्याने समस्या,मागण्या आहेत.अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी राजकारणात समाजाचा सहभाग ,हिस्सा असायलाच पाहिजे.समाजातील पत्रकार, सामाजीक कार्यकर्ते, संस्था,मंडळाचे पदाधिकारी आपापल्या परीने आवाज उठवितात पण समाजातून त्यांना हवा तवा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. पुण्यश्लोक अहिल्याबाईं होळकर प्रबोधन मंचाचे मधुजी शिंदे,बघेल सर,पाचपोळ सर व पांडुरंग धायगुडे सर यांच्या अथक प्रयत्नानी पुराव्याचे कागदपत्र जुळवा जुळव करुन आरक्षण लढाई आता अंतीम टप्यांमध्ये आणली.परंतु समाजातील समाज बांधवांनी त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी ,आर्थिक मदत करण्याऐवजी पैशाचा हिशोब मागतात.हे बरोबर नाही.जरी उद्या आपल्याला न्यायालयीन लढाईत यश आले तरी पण पुन्हा कुणी ना कुणीतरी आपल्या विरोधात न्यायालयात जाणारच हे निश्चित धरुन चालले पाहिजे.ही आरक्षण अमंलबजावणी समस्या कायमस्वरूपी समूळ नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी तमाम धनगर समाज बांधवांनी हातावर हात धरुन बसण्याची वेळ नाही.आंदोलने,जाहिर निषेध तर कराच पण सांगावेसे वाटते,” धनगरांच्या वाघानों,आता आक्रमक व्हा. “
“पुरे झाली आता तुझी अन्यायाची भाषा.
मनगटाने जिंकून घे,तू आता दाही दिशा”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!