ताज्या घडामोडी

श्री. मयुरेश कोले यांची पोस्ट खात्याच्या डाक अधिक्षक पदी निवड

Spread the love

संघर्षातुन यशाचे उत्तुंग शिखर गाठले
कडेगाव ..गोरखनाथ औंधे
लेंगरे ता खानापूर येथील श्री.मयुरेश कोले यांची भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत परिक्षेतुन डाक अधिक्षक (पोस्टल सुपेरिन्टेंडेंट) पदी 2019 साठी संपूर्ण भारतात सातव्या क्रमांकाने निवड झाली आहे. सांगली जिल्ह्यातुन परीक्षेद्वारे या पदावरती विराजमान होणारे गेल्या तीस वर्षातील ते पहिलेच मानकरी ठरले आहेत.
श्री.मयुरेश कोले यांनी पोस्टामध्ये 2006 सालापासून आपल्या सेवेची सुरवात करून ते पोस्टल असिस्टंट, इन्स्पेक्टर ऑफ पोस्टस आणि आता पोस्टल सुपेरिन्टेंडेंट या विविध खात्या अंतर्गत परिक्षा देवुन या पदावरती अथक परिश्रमाच्या बळावरती अखेर हे यश संपादन केले आहे. एवढ्या कमी वेळात अशा पध्दतीचे यश मिळवणारे मयुरेश कोले हे पोस्ट खात्यातील एक आदर्श व्यक्तीमत्व बनले आहेत.
आई वडीलांचे संस्कार आणि कुटुंबाची शिस्त यातून त्यांचे व्यक्तीमत्व घडले आहे.
त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवराकडुन कौतुक होत आहे.
येणाऱ्या काळात भारतीय डाक सेवेचे उपक्रम अधिक अधिक लोकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. पोस्ट खात्याने नेमून दिलेल्या जबाबदरीला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. माझ्या या यशात योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार व्यक्त करतो …मयुरेश कोले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!