ताज्या घडामोडी

झी मराठी’वरील माझ्या नवर्‍याची बायको’ या मालिकेमुळे घराघरात आणि मनामनात पोहोचता आल्याचा आनंद आहे.. – अभिनेते देवेंद्र दोडके

Spread the love

अकोला(दि.१५):
गेली पंचवीस वर्षे मी अभिनय क्षेत्रात अभिनेता,लेखक,दिग्दर्शक म्हणून सात्याने नवनवीन प्रयोग व वेगवेगळ्या भुमिका करीत आहे,त्या भुमिकांना रसिक,प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहेच,पण ‘झी मराठी’वाहिनीवरील ‘माझ्या नवर्‍याची बायको’या मालिकेत राधिकाच्या सासर्‍याच्या केलेल्या भुमिकेने मला मनामनात व घराघरात पोहोचवून जो आनंद दिलाय,तो कलाकार म्हणून अधिक प्रेरणादायी असल्याची भावना प्रसिध्द अभिनेते देवेंद्र दोडके यांनी अकोला भेटीत व्यक्त केली.
ते अकोला येथे आले असता ‘आनंदी गुरुकुल’परिवाराशी बोलत होते.याप्रसंगी आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमीच्या संस्थापिका प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी अभिनेते देवेंद्र दोडके यांचे स्वागत केले.यावेळी अभिनेत्री दीपाली बोडके,देवांश बोडके,बँक अधिकारी अमोल तेलपांडे,अँड.अमिता जळगावकर,बालकलाकार अनिरुध्द जळगावकर,वैभव देहेडकर,सतीश गौड प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी झाडीपट्टी रंगभूमी ते मराठी चित्रपट,मराठी मालिका असा यशस्वी प्रवास उलगडतांना ते म्हणाले की,गेली पंचवीस वर्षे मी अभिनय क्षेत्रात काम करीत असतांना १९८९ मध्ये आंटीने वाजवली घंटी त्यानंतर तानी,ताटवा,ते दोन दिवस,रंगकर्मी,मीस लव्हली,शिर्डी साई,सुलतान शंभू सुभेदार,ओ माय डार्लिंग अशा अनेक मराठी,हिंदी,तेलुगु चित्रपटांमधून महत्वपूर्ण भुमिका साकारता आल्याचा व त्यांना प्रेक्षकांची पसंती लाभल्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला.त्यांची नवीन मालिका झी मराठी वाहिनीवर ‘तू चाल पुढे’ १५ आँगष्टपासून सुरु होत असून,सध्या सन मराठी वाहिनीवरील ‘संत गजानन शेगावीचा’या मालिकेमध्ये ते महत्वपूर्ण भुमिका करीत आहेत.
लवकरच त्यांचे पल्याड,निबंध,सिक्स प्लस सिक्स हे व आणखी दोन असे पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.अकोला येथे आल्याने व प्रेक्षकांचे प्रेम मिळाल्याने आनंद झाल्याचीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!