आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

पुणे-मुंबई दरम्यान २१ डब्यांची सिंहगड एक्स्प्रेस सुरु करा : चिंचवड प्रवासी संघ..

Spread the love

पुणे-मुंबई दरम्यान २१ डब्यांची सिंहगड एक्स्प्रेस सुरु करा : चिंचवड प्रवासी संघ.Start 21-coach Sinhagad Express between Pune-Mumbai: Chinchwad Pravasi Sangh.

आवाज न्यूज : चिंचवड वार्ताहर १२ एप्रिल.

पुणे-मुंबईदरम्यान सकाळी पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस जाते त्याला चाकरनामे इतर प्रवासियांची गर्दी वर्ष भर असते. सोमवारी महिला डब्यात पासधारक व ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करणार्‍या महिला प्रवासीयांमध्ये वादावादी झाली. पिंपरी व चिंचवडसाठी एकाच बोगीत विभागणी रेल्वे विभागाने केली. चिंचवड प्रवासी संघ १९९१ सालापासून स्वतंत्र बोगी पिंपरी व चिंचवडसाठी मागणी करीत आहे, असे लेखी आश्वासन ही दिले.परंतु; कृती केली नाही.

पासधारकांची अरेरावीमुळे सामान्य प्रवासीयांनी निमुटपणे प्रवास करावा लागतो. अनेकवेळा भांडणे देखील झाली. परंतु, उपाययोजना मात्र; कोणत्याच केल्या जात नाही. सोमवारी चिंचवड प्रवासी संघाच्या उपाध्यक्षा निर्मला माने तसेच सहकारी दिपाली शिंगोटे, शितल धुर्वे महिला डब्यात प्रवास करीत असताना पासधारक महिला प्रवासी व इतर महिला प्रवासीयांमध्ये वादविवाद झाला. भांडणे होता-होता वाचली. त्यावेळी माने त्यांना म्हणाल्या पासधारकांनी इतर महिला प्रवासीयांमध्ये वादविवाद करू नये, असे त्यांना म्हणाल्या पासधारकांनी इतर महिला प्रवासीयांनाही समजून घेतले पाहिजे. पास काढला म्हणून वेगळे काय केले, आम्ही देखील तिकिटे काढलीत कधी तरी प्रवास करणार्‍या महिलांनीहि समजून घेतले पाहिजे, अशी भूमिका चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांच्याकडे केली.

पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी सामान्य प्रवासीयांसाठी असलीच पाहिजे. त्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी करीत आहोत. पूर्वी डबल डेकर सुरु होती. ती अचानक बंद केली. सध्या सिंहगडला १७ डबे आहेत. लोणावळा येथे दोन बोगी उघडल्या जातात. पुणे ते लोणावळा ६३ कि.मी. चा प्रवास बोगीत चिटपाखरू नसते. १७ ऐवजी २१ डब्यांची सिंहगड एक्स्प्रेस सुरु करण्यात यावी. पिंपरी चिंचवडला स्वतंत्र बोगी सर्वसाधारण प्रवासीयासाठी असावी पासधारकांची अरेरावी बंद करण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आर.पी.एफ) जनरल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (जी.आर.पी.एफ.) पुरुष व महिला पोलीस बंदोबस्त सिंहगड एक्स्प्रेसमध्ये नियमित सुरु करण्यात यावा.

डबल डेकर कोकण मार्गावर धावते. मध्यरेल्वे मार्गावरही सोडण्यात यावी, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्षा निर्मला माने, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, नयन तन्ना, सुरज आसदकर, मनोहर जेठवानी, इकबाल सय्यद, संदीप शहा, नारायण भोसले आदींनी रेल्वे मंत्र्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!