ताज्या घडामोडी

शिवनी औंढी धरण रस्ता पूर्ववत दुरुस्त करणेबाबत तहसीलदार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

Spread the love

शिराळा-शिवनी औंढी धरण रस्ता पूर्ववत दुरुस्त करणेबाबत तहसीलदार यांना शुक्रवारी शेतकऱ्यांचे निवेदन शिराळा प्रतिनिधी : शिराळा ते शिवनी औंढी धरण रस्ता हा पूर्वापार अस्तित्वात आहे. तो दुरुस्त करून मिळावा याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना शुक्रवारी रस्ता दुरुस्ती बाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात शेतकरी म्हणतात की, सदर रस्त्यावर शासकीय खर्चातून पूर्ण खडीकरण व काही ठिकाणी डांबरीकरण देखील वेळोवेळी झाले आहे.असे असताना काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेत जमिनीलगतचा रस्ता उकडून नाहीसा केला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे शेती कामासाठी अवजारांची ने आन करता येत नाही. तसेच शेतात असणाऱ्या जनावरांना चारा ने आण करणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर उसाची जड वाहतूक देखील या रस्त्यावरून करणे अत्यंत दुरापास्त झाले आहे. तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की, संबंधित ज्या लोकांनी सदर खोदलेला रस्ता आहे तो येत्या आठवडाभरात पूर्ववत करून मिळावा. शासकीय खर्चाने झालेल्या रस्त्याची खडी मुरूम व साहित्याची चोरी करून विल्हेवाट लावणाऱ्या लोकांवर शासनाच्या वतीने कठोर कारवाई करावी. या मागण्या वरती त्वरित अंमलबजावणी हवी अन्यथा आम्हा सर्व शेतकऱ्यांपुढे आमच्या कुटुंब व गुराढोरांना सहित आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यापासून पर्याय राहणार नाही तरी आमच्या मागणीचा विचार करता त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर भाजपा नेते रणजितसिंह नाईक, सम्राट शिंदे, नगरसेवक उत्तम उर्फ बंडा डांगे, जयसिंग गायकवाड शंकर डांगे संभाजी डांगे बाबासो पाटील महादेव नलवडे बळीराम डांगे खंडोजी नलवडे साईनाथ नलवडे सुभाष नलवडे संभाजी डांगे शंकर शिंदे दत्तू नलवडे सनी राज नलवडे बजरंग डांगे जयवंत डांगे विश्वजीत डांगे कृष्णा डांगे योगेश नलवडे सर्जेराव डांगे आधी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!