श्री दत्त पतसंस्थेचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्या सारखे – सचिन जाधव
शिराळा प्रतिनिधी
इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवी घेऊन विविध ठिकाणी खाजगी नोकरी करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होऊन वन परिक्षेत्र अधिकारी पदावर शिराळा येथे रुजू झालेले सचिन जाधव यांनी श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर याठिकाणी सदिच्छा भेट दिली. पतसंस्थेची सुसज्ज स्वामालकीची इमारत, डेटा सेंटर, सोलर सिस्टीम, वॉटर ए टी एम सिस्टीम, पतसंस्थेची स्थापनेपासूनची घोडदौड आणि प्राप्त झालेले पुरस्कार यावरून मजबूत आणि सुंदर व्यवस्थापन कौशल्य सिद्ध होत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव यांचा शाल, श्रीफळ, स्मरणिका देऊन संस्थापक प्राचार्य डॉ पी बी कुलकर्णी यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक व प्रधान शाखेचे शाखा प्रमुख दिनेश हसबनीस, कार्यलक्षी संचालक संजय हिरवे, सिनिअर ऑफिसर महेश कबाडे, ग्राहक संपर्क अधिकारी अरविंद जाधव, ई. डी. पी. मॅनेजर सत्यजित झेंडे, ज्युनिअर ऑफिसर सोमनाथ वाळवेकर, मुमताज संदे, शशिकांत पिसे, शंकर सूर्यवंशी, कू. भारती खंडागळे, सौ. आसावरी जिरगे, कू. गौरी साळुंखे, विकी गायकवाड, राजेंद्रकुमार पाटील, प्रदीप ताटे, संजय भक्ते, फजल खाटीक उपस्थीत होते.