ताज्या घडामोडी

कै.रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयात गणित सप्ताह साजरा

Spread the love

. रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालया मध्ये भारताचे महान गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणित सप्ताह म्हणून साजरी करण्यात आली.
त्यानिमित्त पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणितीय परिपाठ सादर केला. दुसऱ्या दिवशी गणित शिक्षिका कु. आनंदी कुंभार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तिसऱ्या दिवशी गणितीय प्रश्नमंजुषा घेण्यात आली. चौथ्या दिवशी गणितीय भित्तिपत्रकांचे आयोजन करण्यात आले. तर पाचव्या दिवशी गणितावर आधारित रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या साप्ताहिक कार्यक्रमाच्या नियोजनाला गणित शिक्षिका कु. वैशाली चव्हाण मॅडम,श्री.जाधव सर, श्री.माने सर ,श्री. पाटील सर, सौ.पाटील मॅडम, कुमारी पवार मॅडम शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये श्री. कारंडे सर, श्री.दळवी व श्री गुरव यांनी सहकार्य केले. संपूर्ण सप्ताहाच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. येडके सर यांचे लाभले.तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.मीरा शिंदे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!