क्रीडा व मनोरंजन

खेलो इंडिया युथ गेम्स गोविंद शर्मा खो-खो स्पर्धेत तांत्रिक संचालक पदी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई १५ जाने. (क्री. प्र.), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांची ५ वी खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ या स्पर्धेतील खो-खो स्पर्धेत तांत्रिक संचालकपदी निवड करण्यात आली आहे. भारत सरकार आणि भारत सरकारच्‍या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्‍या संयुक्त विद्यमाने ५ वी खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ ही स्पर्धा मध्य प्रदेश येथे ३० जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणार आहे. सदर स्पर्धेत ३० जाने ते ३ फेब्रु. २०२३ या कालावधीत सायकलिंग कॉम्प्लेक्स, राणीताल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जबलपुर, मध्य प्रदेश येथे खेलो इंडिया खो-खो स्पर्धा आयोजित केली आहे.

गोविंद शर्मा यांनी या आधी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार पद सांभाळले होते. त्याच बरोबर त्यांनी विविध जिल्हा, राज्य व राष्ट्रीय खो-खो स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!