ताज्या घडामोडी

भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना.. आत्मचरित्राची फुलोरा साहित्य रत्न पुरस्कार २०२२ करीता निवड.

Spread the love

मुंबई कांदिवली पश्चिम येथील कवी, लेखक,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना …या आत्मचरित्राची फुलोरा साहित्य रत्न पुरस्कार २०२२ करीता निवड करण्यात आल्याचे फुलोरा कोअर कमिटी प्रमुख सुनिल सातपुते यांचे कडून भारत कवितके यांना पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी जन्मदिवस .मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो,मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्याकरितां मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून १२ वे राजस्तरीय काव्य संमेलन फुलोरा कलेचे माहेरघर समुहाव्दारा संगमनेर येथे २७फेब्रुवारीला होत आहे. या काव्यसंमेलनात भारत कवितके यांना त्यांच्या आयुष्य उसवताना….या आत्मचरित्रासाठी फुलोरा साहित्य रत्न पुरस्कार २०२२मान्यवरांच्या हस्ते देण्यांत येऊन गौरविण्यात येणार आहे.भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना…या आत्मचरित्राचे प्रकाशक पंढरपूर येथील प्रविण भाकरे समीक्षा पब्लिकेशन आहेत. कोल्हापुरी फेटा,फुलोरा बॅच ,सन्मानपत्र, व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.८आक्टोबर २०२१ रोजी भारत कवितके यांचे वाढ दिवसाचे निमित्त आयुष्य उसवताना या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा झाला .त्यांच्या संघर्षमय पण यशस्वी जीवनाचे आत्मचरित्र अगदी थोड्याच अवधीत अत्यंत लोकप्रिय झाले आहे. यापूर्वी भारत कवितके यांची सांज,शोधतो मी किनारा,अरे मी एकटा,आकाश तारकांचे,मी एक वृत्तपत्र लेखक,आदि पुस्तके प्रकाशित झालेली असून सर्वच पुस्तकांना आज पर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आयुष्य उसवताना या आत्मचरित्रास मिळणारा हा पहिलाच पुरस्कार आहे.भारत कवितके यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने समाजाच्या विविध स्तरातून त्यांचेवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!