ताज्या घडामोडी
गडनरळ येथील मयुरेश चौघुले यांची शिवशंभू प्रतिष्ठान च्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड
मयुरेश चौघुले, गडनरळ यांची नुकतीच शिवशंभू प्रतिष्ठान च्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये सक्रिय आहे. श्री चौघुले यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात संस्थेचे विचार ध्येय धोरण समाजात योग्य पद्धतीने पोचविण्यासाठी नियुक्ती केली आहे.
त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. (रजि.) संस्थेने दिलेले पद मी आज पासून स्वीकारत आहे.माझ्या सारख्या सर्व सामान्य सामाजिक कार्यकत्याला रत्नागिरी, जिल्हा अध्यक्ष पद नियुक्त केल्याबद्दल मी आभारी आहे. मी मनापासून संस्थेचे काम करेन.संस्थेचे विचार, ध्येय, धोरण समाजात योग्य पद्धतीने पोचविण्याचा प्रयत्न करेन. असा विश्वास व्यक्त करतो असे चौघुले यांनी स्पष्ट केले.