ताज्या घडामोडी

शिराळा युवक संघटनेच्या 25 व्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love

4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत भव्य अंडरआर्म हाफपिच टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा

शिराळा प्रतिनिधी

शिराळा संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवत आहेत. हे वर्षी 25 व्या रौप्य महोत्सवा आहे. त्यामुळे 2022-2023 हे रौप्य महोत्सवाचे औचित्य साधन शिराळा शहरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक माजी सरपंच देवेंद्र पाटील यांनी केले.
देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून शहरासह तालुक्यात सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. यावेळी पाटील म्हणाले आता पर्यंत या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करणे, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धेच्या आयोजना बरोबर कोरोना काळात संघटनेने रोग प्रतिकारक शक्तीवर्धक इम्युनिटी बूस्टर बॉटलचे मोफत वाटप केले तसेच संघटनेच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप ही केले आहे.
शिराळा युवक संघटनेच्या 25 वा रोपे महोत्सव असल्याने संघटनेच्या वतीने 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत भव्य अंडरआर्म हाफपिच टेनिस बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लक्ष्मी चौक, सद्गुरू आश्रम शाळा मैदान, शिराळा येथे सायंकाळी 6 ते 10 ह्या वेळेत आयोजीत केल्या आहेत. तसेच कॅरम स्पर्धेचे हि आयोजन करण्यात येणार आहे‌त. येथून पुढील काळात ही सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात शिराळा युवक संघटना अग्रेसर राहिल असे प्रतिपादन देवेंद्र पाटील यांनी केले. यावेळी मा.पं.स. सदस्य लालासो तांबीट, प्रशांत कांबळे, वैभव कुंभार, रवि यादव, राहुल पवार, मंगेश कांबळे,आसिफ काजी, विनोद घाडगे,धमेंद्र आलेकर, सुभाष कदम, अजय नलवडे तसेच संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.‌

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!