ताज्या घडामोडी

वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले परंतु संस्था परिवारातून नाही… शरण पाटील

Spread the love

ता. उमरगा, ता. ३१ (प्रतिनिधी)

चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्‍चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते. म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर प्रेम, नातं व मैत्री करावी असे नाते जपणारे वाकडे सर आज आपल्यातून वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असले तरी संस्थेच्या परिवारामधून ते केव्हाही सेवानिवृत्त होणार नाहीत. त्यांचा आपल्या सर्वांना सहवास कायम राहील, अशी अपेक्षा शरण पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. प्रदीर्घ सेवेनंतर प्रतिभा निकेतन किमान कौशल्य कनिष्ठ महाविद्यालयातील अकाऊंड विभागातील सेवानिवृत्त उपप्राचार्य राजेंद्र वाकडे व पत्नी संध्याताई यांचा सोमवारी (ता. ३१) रोजी ३१ वर्ष ४ महिने पूर्ण करुन सेवानिवृत्त झाल्याबद्ल सांस्कृतिक सभागृहात त्यांचा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते कै. माधवराव पाटील यांची प्रतिमा भेट देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, उस्मानाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरूजी, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, कोथळीचे बसवराज पाटील, माजी मुख्याध्यापक जी. एस. चिलोबा, सरपंच योगेश राठोड, मुख्याध्यापक प्रविण गायकवाड, सेवानिवृत्त प्रा. राजेश दलाल, काशीनाथ मिरगाळे, विमा प्रतिनिधी शिवकुमार स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक महादेव जिडगे, राजेंद्र गुरव, प्रा. शिवाजी राजोळे, प्रा. शंकर मुर्गे, सेवानिवृत्त अभियंता अशोक वाकडे, डॉ. राहूल चिलोबा, विनय वाकडे, उल्हास घुरघुरे, रत्नदीप वाकडे, शितल चिलोबा आदिंनी पुढाकार घेतला. सत्काराला उत्तर देताना राजेंद्र वाकडे यांनी संस्थेने आजपर्यंत माझ्यावर जी जबाबदारी टाकली, संधी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. अशोक सपाटे, प्रविण गायकवाड, सुधाकर वडगावे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डी. व्ही. बिराजदार यांनी मानले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!