ताज्या घडामोडी

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
सागांव दि. 8/3/2023
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये जागतिक महिला सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम.दिवे एस. बी मॅडम यांनी केले. तर मुख्याध्यापक ए आर पाटील सर यांनी निमंत्रित सर्व महिला स्वागत करून विद्यालयातील यशवंत विद्यार्थ्यांची यशोगाथा सांगून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सागांव गावच्या लोकनियुक्त सरपंच अस्मिता पाटील मॅडम होत्या.तर प्रमुख पाहुण्या आदर्श शिक्षिका कविता पाटील मॅडम होत्या. तसेच सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्षा सौ विद्या पाटील मॅडम प्रमुख उपस्थितीत होत्या. तसेच प्रियांका सत्यजित पाटील मॅडम, कीर्ती गायकवाड, डॉ. जयश्री पाटील मॅडम, अमृता कुलकर्णी,शितल कुंभार,राजनंदिनी पाटील मॅडम, शुभांगी गायकवाड मॅडम ,छाया कांबळे मॅडम संगिता कांबळे मॅडम तसेच आदर्शा महिला ग्रामसंघ, ताराराणी महिला ग्रामसंघ,ज्ञानदीप समूह,पारसनाथ समूह, वनश्री समूह,राधिका समूह आदि अध्यक्षा, सदस्या , तसेच माता पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.‌

या कार्यक्रमाचे अध्यक्षांची निवड आर एम गावडे मॅडम यांनी केली तर अनुमोदन टी. बी कुरणे मॅडम यांनी दिले. प्रमुख पाहुण्यांची ओळख ए बी साळुंखे मॅडम यांनी करून दिली.
याप्रसंगी श्रीमती शारदा चंद्रकांत कांबळे
ग्रामपंचायत कार्यालय सागांव
स्वछता दूत म्हणून व माजी सैनिक श्री. माणिक पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ.लता माणिक पाटील यांचाही विद्यालयाचे वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आराध्या घागरे,आर्या घागरे, ऐश्वर्या माने या विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त भाषणे केली तर वेदिका कांबळे हिने नारी शक्ती गीत नृत्य सादर केले.

सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्षा सौ विद्या पाटील,व डॉ जयश्री पाटील मॅडम यांनी महिलांनी कर्तृत्ववान बनण्याचा उपदेश दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या कविता पाटील यांनी स्वतः आदर्श शिक्षिका जडणघडणीत विद्यालयाचे व विशेषतः प्रा बी एम नलवडे सर, प्रा एस डी जमदाडे सर व सर्व कर्मचारी सेवक यांचे मार्गदर्शन व योगदान अनमोल ठरले असे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. महिलांनी तीव्र इच्छाशक्तीने स्वतः बरोबर कुटुंब व समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच महिला विना समाज प्रगती होऊच शकत नाही. असे आपल्याला मनोगतात सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. अस्मिता पाटील मॅडम यांनी महिलांनी काळानुरूप स्वयंसिद्ध बनावे असे सांगून सर्व महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम संपन्न करण्यात विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे आभार सौ. एस. एस. इंगवले मॅडम यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ यु आर नांगरे मॅडम यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!