ताज्या घडामोडी

भारत कवितके राज्यस्तरीय प्ररेणा पुरस्काराने सन्मानित.

Spread the love

रविवार दिनांक २४एप्रिल २०२२ रोजी कोल्हापूर येथील हुपरी मधील छत्रपती शाहू वाचनालय येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय आयोजीत ११ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात मुंबई मधील साहित्यिक भारत कवितके यांच्या आयुष्य उसवताना या आत्मचरित्र पुस्तकास राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले,अत्यंत अल्पावधीत आयुष्य उसवताना या आत्मचरित्राने साहित्यिक क्षेत्रातआपले वेगळेपणाची छाप पाडली,भारत कवितके यांच्या आयुष्याचा संघर्षमय पण यशस्वी जीवनाची जडणघडण ,आयुष्यातील चढ उताराचे आत्मप्रौढी न मिरवता केलेले वर्णन मनाला चटका लाऊन डोळ्यात टचकन पाणी आणणारे आ हे.याप्रसंगी संमेलन अध्यक्ष प्रा.सुरेश कुराडे,उद्घाटक राजु मगदुम प्रमुखपाहुणे शांतीलाल मांगळे,कवी सरकार,स्वागताध्यक्ष यशवंत पाटील ,सह अनेक साहित्यिक क्षेत्रातील कवी कवयित्री उपस्थित होत्या,सदर पुरस्कार मुळे भारत कवितके यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!