ताज्या घडामोडी

पाडळेवाडी ग्रामपंचायत सुंदर ग्राम स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा : पंचायत समिती कडील अमृत महाआवास अभियान कार्यक्रम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी आमदार नाईक यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांना घरकुल योजनेच्या घराची प्रतिकृती वाटप करण्यात आली. पाडळेवाडी ग्रामपंचायतीने सन 2021/2022 स्व. आर.आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत अभियान तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला त्याबद्दल आमदार मानसिंगभाऊंच्या हस्ते माजी सरपंच पुष्पा पाटील, नूतन सरपंच विजय लोकरे व ग्रामसेवक दिग्वीजय राऊत यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली, शाखा अभियंता बाहुबली हुक्कीरे व श्री. साळुंखे तसेच सर्व कनिष्ठ अभियंता, विविध गावचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, योजनांचे ठेकेदार, ग्रामसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!