ताज्या घडामोडी

ए.पी.आय. शिवाजी नागवे यांना पोलीस खात्यातून कायम स्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी

Spread the love

वरील विषयास अनुसरून निवेदन देण्यात येते की, मायबाप शासनकर्तेयानो धनगर समाजाने जगावे की मरावे हे एकदाच सांगा? यांचा समोरासमोर सोक्षमोक्ष व्हावा. ए. पी. आय. शिवाजी नागवे आणि यामध्ये सामील असणाऱ्यांना पोलीस खात्यातून कायम स्वरूपी बडतर्फ करावे.

 

शासकीय नोकरीत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे व त्यांच्या सहकार्याने शासकीय पदाचा गैरवापर करून आपल्या नातेवाईकांना वाचविण्यासाठी केला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने निलंबित करणेत यावे. अन्यथा पोलीस दलातील अशा अधिकारायामुळे पोलीस दलावरील जनतेचा विश्वास नाहीसा होईल. त्यामुळे जातीयवादाचा ठपका बसेल.
ही घटना जालना जिल्ह्य़ातील कोकाटे हादगांव ता. परतुर जि. जालना येथे शेतीच्या वादातुन धनगर समाजाच्या घरावर जातीयवादी गावगुंडाकडुन सामुदायिक हल्ला करण्यात आला. यात अनेक धनगर बांधव जखमी झाले. याची तक्रार देनेसाठी आष्टी पोलीस चौकीत गेले असता, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून विनापरवानगी अटक करून लाॅक अपमध्ये टाकले. ए. पी. आय. शिवाजी नागवे यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे. या मारहानी बाबतचे काॅल रेकॉर्डिंग सोशल मिडियावर व्हायरल झाले असून त्यात पोलीस अमानुषपणे मारहाण करीत असताना ऐकु येत आहे. सदरील घटना ता. 28/11/22 रोजी आष्टी पोलीस चौकी येथे घडलेली आहे. यावेळी बिट जमादार बहिरवार यांनीही कोकाटे हादगांव येथील सात नागरिकांना मारहाण केली. फिर्याद देनेसाठी गेलेल्या लोकांवर भा. द. वि. 324, 323, 504 व 148 प्रमाणे खोटे गुन्हे दाखल केले. न्यायालयासमोर हजर न करता दोन दिवस पोलीस स्टेशनला डांबुन ठेऊन मारहाण केली. आष्टी पोलीसांकडून अधिकाराचा दुरूपयोग करण्यात आला असून पदाचा गैरवापर करणाऱ्या, जातीयवादी भुमिका घेऊन गोरगरीब धनगर बांधवांना मारहाण करणाऱ्या व यामध्ये सामील असलेल्या पोलीसांना कायम स्वरूपी निलंबित करावे.अन्यथा धनगर समाजाकडून संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.

प्रती:-
मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब.
मा. गृहमंञी श्री. देवेंद्र फडणवीस साहेब. महाराष्ट्र राज्य.

यावेळेस उपस्थित मल्हार क्रांती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी व्हनमाने. कार्याध्यक्ष विजय टेंगले. जिल्हाध्यक्ष सुखदेव काळे. जिल्हाध्यक्ष युवक सागर माने. राहुल सरक. शहाजी शेळके. उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ माने इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!