ताज्या घडामोडी

पालघर जिल्हा- मीरा-भाईंदर गणित स्पर्धेत शिरगाव चे यश

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
भारतीय गणितज्ञ श्री रामानुजन यांचा जन्मदिवस सर्वत्र गणित दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्त साधून हुझेफा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वसई आणि ऑल इंडिया आयडियल टीचर असोसिएशन पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ गणित आणि विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा हुझैफा उर्दू हायसकूल व ज्युनिअर कॉलेज येथे पार पडली.

या स्पर्धेमध्ये मिरा रोड ते डहाणू रोड पर्यंत २७ शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये काही राऊंड विना पर्यायचे ,काही राऊंड पर्यायचे, तर काही राऊंड लेखी व शेवटचा राऊंड ऑनलाईन कहुत ॲपवर होता.

प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सिनियर ग्रूप मध्ये प्रथम क्रमांक नविद एज्यू.सो.चे उर्दू हायस्कूल शिरगाव, द्वितीय क्रमांक रॉयल गर्ल्स हायसकूल मिरा रोड तर तृतीय क्रमांक मुफिदुल यातामा हायस्कूल मिरा रोड यांनी पटकावला. तर ज्युनियर ग्रूपमध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उर्दू स्कूल, मल्यान डहाणू रोड, द्वितीय क्रमांक रॉयल गर्ल्स हायस्कूल मिरा रोड तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उर्दू स्कूल शिरगाव यांनी पटकावला.विजेता शाळांना ट्रॉफी सोबत रोख रक्कम आणि सर्टिफिकेट देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!