ताज्या घडामोडी

इस्लामपूर काँग्रेस शहर अल्पसंख्यांक उपाध्यक्षपदी किस्मत नदाफ यांची निवड

Spread the love

इस्लामपूर / प्रतिनिधी :
इस्लामपूर काँग्रेस शहर अल्पसंख्यांक उपाध्यक्षपदी किस्मत मुबारक नदाफ यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांच्या हस्ते देण्यात आले.
नंदकुमार कुंभार म्हणाले ,समाजातील अल्पसंख्याक हा महत्त्वाचा घटक आहे. शहरातील अल्पसंख्याक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही मदत लागेल ती पुरवली जाईल.
ही निवड इस्लामपूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष आयुब पठाण यांनी केली. यावेळी काँग्रेसचे विभागीय उपाध्यक्ष सलमान आवटी , अमीर खाटीक , आनंदराव पाटील उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!