ताज्या घडामोडी

भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी हवी, प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे प्रतिपादन

Spread the love

निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
तारीख ९
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारी (ता.९) पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या मैदानावर विद्यार्थ्यांना ‘भविष्यावर बोलू काही’ मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्याना मध्ये प्रख्यात वक्ते गणेश शिंदे यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,
अलीकडे मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलांकडे सुद्धा खूप क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेचा योग्य तो उपयोग करणे गरजेचे आहे. समाजातील आर्थिक परीस्थिती बदलायची असेल तर शिक्षणा शिवाय पर्याय नाही. आपल्याबरोबरच आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी ठेवा. शिक्षण घ्या,भरारी घ्या. प्रत्येकाकडे वेगळे पण आहे. त्या साठी सिंह, हत्ती, चित्ता, कोल्हा,ससा, मोर, कोकिळा यांची उदाहरणे देऊन वेगळेपण विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले.

शिंदे यांनी पुढे सांगितले की, आयुष्याची मजा घ्या. अभ्यासासाठी मात्र सदैव ऐकरुप व्हा. विद्यार्थी मित्रहो मोठी स्वप्न बघा व त्याचे नियोजन करुन ती साकार करण्याचा प्रयत्न करा.

या मार्गदर्शन व्याख्यानाच्या प्रारंभी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ॲड.कीर्ती भोईर, सुजय जाधव, वैभव म्हसणे, अर्जुन तांडेल, आदेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, पालघरच्या नगरसेविका गीता संखे, नगरसेविका रोहिणी अंभुरे, भगिनी समाज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक, आर्यन हायस्कूलचे मुख्याध्यापक गावित तसेच विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश्वर नाईक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!