ताज्या घडामोडी
नानासाहेब शिंदे यांची भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड
सामाजिक कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. गणेश ताठेसाहेब यांनी नानासाहेब शिंदे यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवडीची घोषणा केली. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष व भाजपा नेते संजयभाऊ केनेकर यांच्या हस्ते देण्यात आले त्याप्रसंगी कामगार आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी नानासाहेबांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.