वाटेगाव येथे कै. बाबासाहेब पाटील यांचा स्मृतिदिन.
शिराळा प्रतिनिधी / वाटेगाव (ता. वाळवा) येथे कै. बाबासाहेब पाटील (भाऊ) यांच्या स्मृतिदिननिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी अभिवादन केले. यानिमित्ताने कै. बाबाभाऊ यांनी केलेल्या सामाजिक कार्यास आमदार नाईक यांनी उजाळा दिला. तालुक्याचे माजी सभापती रविंद्रकाका बर्डे, स्व. बाबाभाऊ यांचे ज्येष्ठ चिरंजीव बिपिन पाटील, नितीन पाटील, धीरज पाटील, नाना पाटील, शुभम पाटील, निवृत्त ए. सी. पी. नांगरे साहेब, माजी सरपंच प्रकाश पाटील, ज्येष्ठ नेते संभाजी लोकरे, माजी सोसायटी चेअरमन राजाभाऊ चव्हाण, एम आर पाटील सर, निवृत्त पोलीस अधीक्षक विजय चौगुले, अशोक पाटील, संभाजी काळे, मुख्याध्यापक नांगरे सर, अरुण बर्डे, राहुल पाटील, गणपती यादव, राजवर्धन पाटील, चंद्रकांत मोहिते आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.