आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

राष्ट्रीय मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन चे पदाधिकारी संमेलन संपन्न.

राष्ट्रीय मातृछाया जनसेवा फाऊंडेशन सलग्न पोलीस मित्र समिती या केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेचे पदाधिकारी संमेलन,कार्यकर्ता मेळावा,स्वयंरोजगार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Spread the love

राष्ट्रीय मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन चे पदाधिकारी संमेलन संपन्न.

आवाज न्यूज :  पुणे, प्रतिनिधी १६ ऑक्टोबर.

राष्ट्रीय मातृछाया जनसेवा फाऊंडेशन सलग्न पोलीस मित्र समिती या केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेचे पदाधिकारी संमेलन,कार्यकर्ता मेळावा,स्वयंरोजगार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली.प्रस्ताविक मध्ये राष्ट्रीय जनसेवा फाऊंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.जयेश (भाऊ)अहिरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा थोडक्यात सांगितला.

यावेळी संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहन(काका) घारे म्हणाले की,फाऊंडेशन याचा अर्थ आहे आधार देणे.लोकांच्या कल्याणासाठी जनमानसाला आधार देणारी मातृ छाया जनसेवा फाऊंडेशन ही संस्था आहे याचा  खूप अभिमान वाटतो.पुढे बोलताना सिने अभिनेत्री व संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा. अर्चना शेफर म्हणाल्या की अशा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची खूप गरज आहे.

म्हणून मी या संस्थेसोबत सामाजिक कार्य करीत आहे.या वेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक राहुल(भाऊ)पोकळे, नूतन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या संस्थापिका.सुनीता डांगे,धायरी शिक्षण संस्थेचे संस्थापक काकासाहेब चव्हाण उपस्थित होते.हे पदाधिकारी संमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा रजनंदिनी अहिरे, स्वामिनी लाईफ चे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश सपकाळ सर,

पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब कोलेकर , महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीता गरुड ,निर्माती दिग्दर्शिका शवेतंबरी एन,डॉ. स्मिता भंगाळे,सुनीता गरुड,नलिनी शिंदे, महाराष्ट्र राज्य महिला जनसंपर्कप्रमुख शिळीमकर ताई ,टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा अनिता ताई सोनवणे,पुणे जिल्हा जनसंपर्क प्रमुख सुनील बोलाडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष सारिका ताई साळवे, ॲड.जोहर इनामदार, अमर शिंदे, गणेश हागे,पुणे शहर अध्यक्ष सतीश दावळे,सुभाष गाडे,वैशाली भालेराव,चंद्रकांत क्षीरसागर, शुभरा किरण,अमर शिंदे,गणेश हगे (सर), चंद्रकांत सायलू, वासुदेव येरुंकर, उर्मिला गोरंबेकर,जयईश्वर अहिरे यांचेसह जयेश अहिरे यांचे माता – पिताजी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष आभार म्हणून आयाझ शब्बीर शेख सरांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!