ताज्या घडामोडी

चेंबूरमध्ये अनिल पाटणकरांच्या प्रयत्नाने नाला रुंदीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

Spread the love

 

मुंबई – बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे लोकप्रिय,माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने आणि पालिकेच्यावतीने चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील वैभव नगर ते मोरया प्रतिष्ठानपर्यंतच्या नाल्याचे रूंदीकरण व नाल्यावर स्लॅब टाकून रस्ता बनविण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच स्थानिक रहिवाशांच्या उपस्थित पार पडले.

यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी सांगितलं की, सुमारे ७ ते ८ कोटींचे हे नागरी विकास काम असून ते जानेवारीपर्यंत आगामी पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा मानस आहे. पावसाळ्यात येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात असतो.त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी या नाल्याचे रुंदीकरण आणि त्याची खोली वाढविण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.या नागरी विकासकामांच्या कार्यक्रमप्रसंगी स्टर्लिग बिल्डकाॅमचे निलेश मोदी, उपविभागप्रमुख महेंद्र नाकटे,महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे,मिनाक्षी पाटणकर,ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग,स्थानिक समाजसेविका मीनाक्षी पाटणकर मा.महिला शाखा संघटीका वैशाली कदम,मा. महिला शाखा संघटीका अनिता महाडिक,कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, युवासेना चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, क्रिस्टल आर्मस सोसायटीचे पदाधिकारी,वैभवनगर एसआरए गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, शिवसेना – युवासेना महिला,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!